Payal Naik
छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची गाडी रुळावर आणणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी.
ती अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिकादेखील आहे. तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
काही वर्षांपूर्वी तिने कर्जत येथे स्वतःचं फार्महाउस उभं केलं. हे सुट्ट्या घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
प्राजक्ता अनेकदा तिच्या फार्महाऊसवर जाते आणि तिथले फोटोही शेअर करते.
तिच्या या फार्महाऊसचं नाव 'प्राजक्तकुंज' आहे. अतिशय आलिशान आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राजक्ताच्या या फार्महाऊसचं भाडं किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
अभिनेत्रीने तिचा हा व्हिला 'द ग्रीन मोन्टाना' नावाने एका कंपनीकडे रजिस्टर केला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिला बुकिंग करून तिथे राहू शकता.
तुम्हाला वीकेंडला शनिवार-रविवार एका दिवासाला 30 हजार रुपये भाडे आहे. तर सोमवार ते शुक्रवारदरम्यान एका दिवसासाठी 17 त 20 हजार भाडे आहे.
प्राजक्ता माळीच्या या व्हिलामध्ये एकूण 15 जण राहू शकतात. यामध्ये तुम्हाला किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डनर अशा अनेक सुविधा तिथे मिळतात.
पर्यटकांना तिथे जेवण बनवण्यास मनाई आहे. त्यांनी आणलेलं जेवण गरम करता येईल. तसेच पाळीव प्राणी घेऊन येण्यास मनाई आहे. तिथे असणाऱ्या हॉटेलमधून तुम्ही जेवण मागवू शकता.
ना अनीत पड्डा, ना अहान पांडे; 'सैयारा'साठी 'या' व्यक्तीने घेतलं सर्वाधिक मानधन