Vrushal Karmarkar
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी बिजू जनता दलाचे नेते आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केले आहे.
दोघांनीही जर्मनीमध्ये लग्न केले आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. दोघांनीही ३ मे रोजी लग्न केले.
हा सोहळा अतिशय खाजगी होता. महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांच्यापैकी कोण श्रीमंत आहे, दोघांची एकूण संपत्ती किती आहे?
महुआ मोईत्रा २०१९ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा लढल्या. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, २०१८-१९ च्या तुलनेत महुआ मोईत्रा यांच्या मालमत्तेत वाढ झाली आहे. त्यांचे उत्पन्न १२ लाख ७ हजार ५४१ रुपये आहे, तर २०१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ५ लाख ५१ हजार ८० रुपये होते.
याशिवाय २०२४ मध्ये त्यांच्याकडे ९.४१ लाख रुपये किमतीचे १५० ग्रॅम सोने, २.७३ लाख रुपये किमतीचा चांदीचा सेट आणि इतर दागिने आहेत.
महुआ मोईत्रा यांचे लंडनमधील नॅटवेस्ट बँकेत खाते आहे. त्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे. याशिवाय त्यांच्याकडे एका खाजगी बँकेत ३३.४ लाख रुपयांच्या आणि १.४५ कोटी रुपयांच्या दोन एफडी देखील आहेत.
तर पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलाकडून चार वेळा खासदार राहिले आहेत. ते १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. त्यानंतर ते २००९ ते २०१९ पर्यंत खासदार होते.
२०२४ मध्ये त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. २००९ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत सातत्याने वाढ झाली. २००४ मध्ये त्यांची मालमत्ता सुमारे २० कोटी रुपये होती.
२००९ मध्ये त्यांची मालमत्ता २९ कोटी रुपये झाली. पिनाकी मिश्रा यांची एकूण मालमत्ता १३७ कोटी रुपये आहे. पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत.
मंदिरात प्रवेशाआधी घंटा का वाजवली जाते?