1931च्या जनगणनेचा खर्च किती? ब्राह्मण समाजाची लोकसंख्या होती सर्वाधिक

Amit Ujagare (अमित उजागरे)

४८.७६ लाख रुपये

१९३१च्या जनगणनेवर झालेला खर्च (१९२१च्या जनगणनेवर ४० लाख रुपये खर्च आला होता.)

१२.८ रुपये

जनगणनेसाठी प्रतिहजार लोकसंख्येमागे आलेला खर्च (१९२१मध्ये हा खर्च १४ रुपये आला होता)

२० लाख

जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी

१८.८३ लाख

जनगणनेमध्ये जात सांगण्यास नकार देणारे नागरिक इतके होते.

६० हजार ७१५

जात सांगण्यास नकार देणारे हिंदू नागरिक (प्रामुख्याने ब्राह्मो व आर्य समाजातील नागरिकांकडून जात सांगण्यास नकार दिला होता)

१८ प्रश्न

१९३१च्या जनगणनेसाठी विचारण्यात आलेले प्रश्न

जातविषयी प्रश्न

वंश, जमात किंवा जात याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा क्रमांक ८ हा होता. (१८७२ पासून १९३१ पर्यंत प्रत्येक जनगणनेत जातीविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता)

३५.०५ कोटी

१९३१ची लोकसंख्या (ब्रह्मदेश आणि अन्य सर्व संस्थानांच्या लोकसंख्येसह) (३१.८९ कोटी - १९२१ची लोकसंख्या)

५२ टक्के

इतर मागासवर्गीय जातींची अर्थात ओबीसी समाजाची लोकसंख्या तेव्हा ५२ टक्के होती.

सर्वांत मोठ्या जाती

ब्राह्मण (१,५०,१०,५८४), जाटव (१,२३,२३,१३६), राजपूत (८१,००,७३५), कुणबी (मराठा समाजासह) (६४,३४,८६१), अहीर (५६,८२,४३७), तेली (४२,५८,४९९), गवळी (४०,५४,४२४), कायस्थ (३८,९६,००४), कुर्मी (३६,८२,८६९), कुंभार (३५,४३,४१५)