अहमदाबाद ते लंडन... अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट किती होते?

Vrushal Karmarkar

विमान कोसळले

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान B787-8 अहमदाबादहून लंडनला जात होते. पण ते उड्डाणादरम्यान कोसळले. यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Air India Flight Ticket | ESakal

देश हादरला

या दुःखद घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या आंतरराष्ट्रीय मार्गाचे तिकिटही स्वस्त नव्हते.

Air India Flight Ticket | ESakal

लाखो रुपये खर्च

एअर इंडियाच्या या विमान प्रवासासाठी प्रवाशांनी हजारो ते लाखो रुपये खर्च केले होते.

Air India Flight Ticket | ESakal

विमानाचे तिकीट

इकॉनॉमी क्लासचे भाडे ₹५६,००० पासून सुरू होते. बिझनेस क्लासच्या जागांसाठी लोकांनी ₹९६,००० ते ₹१.५ लाख रुपये दिले होते.

Air India Flight Ticket | ESakal

विमानाचे भाडे

तर प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे भाडे ८९००० ते ९०००० रुपये आणि फर्स्ट क्लासचे भाडे ४ लाख ६४ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत होते.

Air India Flight Ticket | ESakal

विमानात २४२ लोक

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान बी७८७-८ अहमदाबादहून लंडनला जात होते. पण ते उड्डाणादरम्यान कोसळले. विमानात एकूण २४२ लोक होते. ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते.

Air India Flight Ticket | ESakal

मेडे कॉल

विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले. पायलेटने एटीसीला मेडे कॉल देखील दिला.

Air India Flight Ticket | ESakal

प्रतिसाद

त्यानंतर एटीसीने केलेल्या कॉलवर विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर लगेचच विमान विमानतळाजवळील बाहेर जमिनीवर कोसळले.

Air India Flight Ticket | ESakal