Mansi Khambe
चप्पल किंवा शूज खरेदी करताना, लोक त्यांच्या पायांच्या आरामाकडे तसेच फॅशनकडे खूप लक्ष देतात. अनेकजण त्यांच्या प्रत्येक ड्रेसला मॅचिंग होणारे चप्पल खरेदी करतात.
मात्र चप्पल किंवा शूज जुने होतात किंवा फाटतात तेव्हा अनेक लोक ते फेकून देतात. चप्पल फॅशन ट्रेंडवर परिणाम करतात तितकेच ते पर्यावरणालाही धोका निर्माण करतात. पण कसा ते जाणून घ्या.
चप्पल बनवण्यासाठी अनेक प्रकारची धोकादायक रसायने वापरली जातात. यामध्ये काही चामड्याचे तर काही रबराचे बनलेले असतात. मात्र दोन्हीही पर्यावरणासाठी चांगले नाहीत.
शूज बनवण्यासाठी, रंगविण्यासाठी आणि जोडण्यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे हे शूज किंवा चप्पल पाण्यात शिरल्यावर जलस्रोत प्रदूषित करतात.
तसेच चप्पल बनवण्यासाठी काही कृत्रिम पदार्थांचा वापर केला जातो. जे हवामान बदलासाठी धोकादायक असते.
शूजसाठी चामडे आणि काही नैसर्गिक साहित्य देखील वापरले जाते, ज्यामुळे जंगलतोड होते. यामुळे जुने बूट कचऱ्यात फेकण्याऐवजी ते रिसायकल करू शकता.
पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी बूट फेकून देण्याऐवजी त्यांची दुरुस्ती करता येईल. किंवा तुम्ही बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेले शूज खरेदी करू शकता.