Saisimran Ghashi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झीरोधा सीईओ निखिल कामतनी घेतलेला पॉडकास्ट इंटरव्ह्यु सध्या चर्चेचा विषय आहे.
या पोडकास्टनंतर पीएम मोदींच्या एकूण संपत्तिबद्दल अनेक प्रश्न सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
पंतप्रधान मोदींची 2014 पासून 2024 पर्यंतची एकूण संपत्ती किती आहे हा धक्कादायक आकडा समोर आला आहे.
2014 मध्ये मोदींच्या संपत्तीची किंमत 1.65 कोटी रुपये होती.
मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2.5 कोटी रुपयांच्या संपत्तीची घोषणा केली होती.
त्यांच्या मूव्हेबल अॅसेट्समध्ये 3,02,06,889 रुपये असून त्यात 2.85 कोटी रुपये एसबीआयच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये आहेत.
त्यांच्या इतर संपत्तींमध्ये 45 ग्रॅम सोने गहाण असलेल्या चार अंगठ्यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 2.67 लाख रुपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती 3.02 कोटी रुपये असल्याची घोषणा केली आहे.
या संपत्तीमध्ये मुख्यतः बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट्सचा समावेश आहे. ही माहिती सप्टेंबर 2024मध्ये समोर आली होती.