Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजानी व्यंकोजींना लिहलेल्या पत्रात वागणुकीचे नियम सांगितले होते.
त्यात काही कलमे घातली होती राज्यकर्त्या वर्गाला शिवरायांनी दिलेला हा सल्ला होता.
शिवरायांनी १ मार्च १६७८ रोजी व्यंकोजी यांना एक पत्र पाठवले, ज्यामध्ये त्यांनी योग्य शासनपद्धतीबाबत मार्गदर्शन केले होते.
नातलग व प्रतिष्ठित व्यक्तींचा अपमान टाळावा. त्यांना योग्य तो मान दिला जावा, पण अति महत्त्व देऊ नये.
दरखदार आणि कामगार यांना योग्य अधिकार मिळावेत. दरखाल मोडू नये आणि योग्य मानसन्मान राखावा
महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ल्याशिवाय कृती करू नये. संवाद आणि समन्वय राखून काम करावे.
सेवक आणि अधिकारी नेमताना त्यांच्या निष्ठेची खात्री करावी. गुप्तचर व्यवस्था सक्षम ठेवावी आणि शत्रू-मित्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.
शत्रू व मित्र राजघराण्यात आपल्या वकिलांची नियुक्ती करावी आणि गोपनीय माहिती सतत मिळवत राहावी.
सैन्य, तोफा आणि कारखाने सुरळीत ठेवावेत. राज्याच्या सुरक्षिततेसाठी धर्मद्वेष्ट्यांना स्थान देऊ नये.
शासन करताना गोरगरीब व अनाथ यांना न्याय मिळावा. त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहावे.
देवस्थाने आणि धार्मिक स्थळांचा योग्य बंदोबस्त करावा. त्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
न्यायदान करताना भ्रष्टाचार टाळावा. गरीब आणि पीडितांना न्याय मिळेल, याची काळजी घ्यावी.
शिवरायांनी वचन पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भोसले घराण्याची ही परंपरा कायम राखण्याचा त्यांनी आग्रह धरला.
हे नियम केवळ प्रशासनासाठी नव्हे, तर आदर्श राज्यकर्त्याच्या जबाबदारीचे प्रतिबिंब आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातील ही शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे.