Saisimran Ghashi
महाराष्ट्र राज्यसरकारने 'माझी कन्या भाग्यश्री' बंद करून 'लेक लाडकी' योजना सुरू केली आहे.
मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, शिक्षणाला चालना देणे.
मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे अशी काही उद्दिष्टे आहेत.
1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी ही योजना आहे. अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता येतो.
मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो.
अंगणवाडी सेविका अर्ज ऑनलाइन भरते, त्यानंतर ऑनलाइन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
पहिला हप्ता : मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये
दुसरा हप्ता : इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये
तिसरा हप्ता : सहावीमध्ये सात हजार रुपये
चौथा हप्ता : अकरावीत आठ हजार रुपये
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये
याप्रमाणे एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार