Yashwant Kshirsagar
सोने खरेदी ही केवळ गुंतवणूक नाही तर सोन्याचे दागिने पिढ्यानपिढ्या भारतीय कुटुंबांचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत.
पण सोने खरे आहे की खोटे याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो, अशावेळी घरबसल्या सोप्या पद्धतींनी सोने चेक करता येऊ शकते.
सोन्यावर बीएसआय मार्क आणि त्रिकोणी लोगो आहे की नाही ते चेक करा
दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोने योग्य मानले जाते.
सोन्यावर दोन थेंब व्हिनेगर टाकल्यास, नकली सोने काळे पडते तर खऱ्या सोन्यात काही बदल होत नाही.
सोन्याचे दागिने पाण्यात टाकले तर ते खरे सोने असेल तर पाण्यात बुडते.
सोने हे लोहचुंबकाद्वारे देखील तपासता येते, खरे सोने लोहचुंबकाला चिटकत नाही.
खरे सोने (24 कॅरेट) हे लवचिक असते. दातानी थोडे दाबले तर त्यावर दातांच्या खुणा उमटतात
खरे सोने हे हलके पिवळे असते तसेच त्याला वेगळी चमक असते, धातूवर आदळल्यास त्याचा वेगळा आवाज येतो.