Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे आता मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात झालीये.
पण काही लोक फसून कोकण हापूस आंब्याच्या जागी कर्नाटकचा आंबा घेऊन येतात.
आज आम्ही तुम्हाला कोकण आंबा आणि कर्नाटक आंबा यात फरक ओळखायची सोपी ट्रिक सांगणार आहे.
कोकण हापूसचा सुगंध (वास) हा मधुर असतो तर कर्नाटकी आंब्याला सुगंध नसतो
हापूस आंबा हातात घेतल्यावर साधारण लागतो तर कर्नाटक आंबा जडसर बाटतो.
हापूस आंब्याची साल पातळ तर कर्नाटकी आंब्याची साल जाड असते.
हापूस आंब्याचा आकार थोडासा उभट तर कर्नाटकी आंब्याचा आकार गोलाकार असतो.
कोकण हापूस खाल्यावर गोड लागतो आणि हाताला वायस राहतो पण कर्नाटकी आंबा तुरट लागतो.
हापूस आंब्याचा गर केशरी असतो आणि कर्नाटकीचा पिवळा ( हळदीसारखा) असतो.