Shubham Banubakode
अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर यांचा उत्तम स्रोत आहे.
रोज एक अंडे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच वजन नियंत्रणात राहते आणि मेंदू तल्लख होतो.
नियमित अंडे खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
मात्र, आजकाल बाजारात नकली अंड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. जी आरोग्यासाठी धोकादायक असतात.
नकली अंड्यांमध्ये रसायने, प्लास्टिक आणि रेजिन्सचा वापर होतो. ज्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.
पण असली की नकली अंडी कशी ओळखायची तुम्हाला माहिती का?
असली अंडी खडबडीत आणि टनक असते. त्यावरून तुम्ही असली आणि नकली अंडी ओळखू शकता.
असली अंड्यावर कधीकधी नैसर्गिक दरार किंवा खुणा दिसतात. नकली अंड्यांचे कव्हर मात्र गुळगुळीत असते.
असली अंड्याचा रंग पांढरा किंवा तपकिरी असतो. तो नैसर्गिक दिसतो. नकली अंडी मात्र चमकदार दिसतात. जे सहज ओळखू येतात.
नकली अंड्यांमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो. वरील टिप्स वापरून असली अंडी निवडा आणि निरोगी राहा.