Aarti Badade
कामाची धावपळ आणि तणावामुळे अनेकदा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास 'ॲनिमिया' होऊ शकतो, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे शरीरातील अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे आणि त्वचा फिकट दिसणे यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
थोडं चालल्यावर धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे आणि नखे किंवा डोळ्यांचा खालचा भाग पांढरा दिसणे ही हिमोग्लोबिन कमी झाल्याची मुख्य लक्षणे आहेत.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
रक्ताची पातळी वाढवण्यासाठी पालक, बीट आणि गाजर या भाज्यांचे नियमित सेवन करा. रोजच्या आहारात बीटचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता झपाट्याने भरून निघते.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
डाळिंब, सफरचंद, टरबूज यांसारख्या फळांसोबतच खजूर, काळे मनुके, अंजीर आणि बदाम खाणे अत्यंत फायदेशीर आहे. या पदार्थांमुळे महिनाभरात रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
लोहाचा नैसर्गिक स्रोत म्हणून गूळ-शेंगदाणे, काळे चणे, राजमा आणि मसूर डाळ यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि अशक्तपणा दूर करतात.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
अंड्यातील पिवळा बलक, मासे आणि खेकडे यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी-१२ मुबलक प्रमाणात असते. या पदार्थांच्या सेवनामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला वेग येतो.
Anemia Warning Symptoms of low hemoglobin
Sakal
Varan Bhat with Ghee benefits
Sakal