इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स, फोटो पाहून वैतागलात? 'या' सेटिंगने होईल बंदोबस्त

अंकिता खाणे (Ankita Khane)

तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. कित्येक यूजर्स याठिकाणी दररोज आपले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असतात.

तुम्ही इन्स्टाचे रेग्युलर यूजर असाल, तर तुम्हाला जाणवलं असेल की याठिकाणी आजकाल मोठ्या प्रमाणात अश्लील कंटेंट दिसत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता इन्स्टाने एक नवीन सेटिंग टूल दिलं आहे.

इन्स्टाग्रामवर तुम्हाला साधारपणे तोच कंटेंट दिसतो, जो तुम्ही फोलो केलेल्या यूजर्सनी शेअर केला आहे.

यासोबतच तुम्ही कशा प्रकारचे रील्स लाईक करा यानुसार इन्स्टाचं अल्गोरिदम तुम्हाला नवीन रील्स दाखवतं.

मात्र सोबतच, इन्स्टा हे नवीन रील क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे रील्स देखील रँडमली लोकांच्या फीडमध्ये पाठवत असतं. अशामुळे, आपल्याला कित्येक वेळा फीडमध्ये अश्लील कंटेंट असणारं रील पहायला मिळतं.

यामुळे कित्येक लोक सहसा कोणालाही आपलं इन्स्टाग्राम देत उघडून देत नाही. लहान मुलांच्या हातात फोन देणंही यामुळे अवघड होतं.

तसंच, पब्लिक प्लेसमध्ये इन्स्टाग्राम उघडण्याची भीतीही अनेकांना वाटते. मात्र इन्स्टाच्या या नव्या सेटिंगनंतर तुमची ही भीती नाहिशी होईल.

सजेस्टेड कंटेंट

यासाठी सगळ्या आधी तुम्हाला इन्स्टाग्राम उघडायचं आहे. यानंतर सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला Suggested Content हा पर्याय दिसेल,

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Sensitive Content हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन्स येतील.

तुम्हाला किती सेन्सिटिव्ह कंटेंट पहायचा आहे, हे तुम्ही या पर्यायांमधून ठरवू शकता. अधिक (More), मध्यम (Standard) आणि कमी (Less) असे तीन पर्याय याठिकाणी आहेत.

यातील Less हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सेन्सिटिव्ह आणि अश्लील पोस्ट कमी प्रमाणात दिसतील.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea