केस निरोगी ठेवण्यासाठी बनवा ही होममेड स्मूदी..

Aishwarya Musale

केसगळती

बदलत्या ऋतूनुसार, शरीरावर देखील अनेक बदल होतात. हे बदल काही चांगले असतात तर काही वाईट असतात. असाच एक बदल म्हणजे केसगळती.

hair care | sakal

केसगळतीची समस्या लहान मुलांपासून ते महिला, पुरुषांमध्ये होते. अधिकतर महिलांमध्ये केसगळतीचा त्रास जास्त जाणवतो. अनेकजण यासाठी केसांना वेगवेगळ्या गोष्टी लावतात.

hair care | sakal

योग्य आहार

तसेच, केसांसाठी महागडे उपचार घेणारे काहीजण आहेत. पण तरीही याचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा आहार योग्य ठेवणे गरजेचे आहे.

hair care | sakal

केस

यामुळे तुमचे केस निरोगी राहतील आणि तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट घेण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला केस निरोगी ठेवण्यासाठी स्मूदी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

hair care | sakal

लागणारे साहित्य

अंजीर-4, मनुका - 5 ते 6, अक्रोड - 1 ते 2, काजू - 4, बदाम - 4, तीळ - 1 टीस्पून, चिया सीड्स - 1 टीस्पून, खजूर - 3 ते 4, पाणी, केळी -1, दूध.

hair care | sakal

स्मूदी कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे सर्व साहित्य रात्रभर भिजवावे लागेल. यानंतर एक मिक्सर जार घ्या आणि त्यात केळी आणि दूध मिसळा.

hair care | sakal

आता ते चांगले मिक्स करावे लागेल. नंतर ग्लासमध्ये काढून सर्व्ह करा. हे प्यायल्याने तुमचे केस निरोगी राहतील. याशिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहील.

hair care | sakal

अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात असतात, जे केस मजबूत करण्यास मदत करतात. तसेच केस दाट होतात.

hair care | sakal

मधुमेह असलेल्यांनी रोज फॉलो करा या टिप्स..

Health Care | sakal