Aarti Badade
चपाती मऊ राहणे हे फक्त गव्हाच्या पिठावर नाही, तर पीठ मळण्याची पद्धत, भाजण्याची वेळ आणि साठवणुकीवर अधिक अवलंबून असते.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
चपातीसाठी पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर केल्यास पिठातील ओलावा जास्त काळ टिकतो आणि चपात्या कोरड्या पडत नाहीत.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
पीठ मळताना त्यात थोडे दूध किंवा मलाई घातल्यास दुधातील नैसर्गिक फॅट्समुळे चपातीचे टेक्स्चर तासन्तास अत्यंत मऊ आणि चवदार राहते.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
पीठ मळल्या मळल्या लगेच चपात्या लाटू नका; पीठ सेट होण्यासाठी ते २० ते ३० मिनिटे झाकून ठेवल्यास चपात्या मऊ आणि टम्म फुगतात.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
चपाती मंद आचेवर भाजल्यास ती कडक होते; त्यामुळे मध्यम ते जास्त आचेवर चपाती पटकन भाजल्यास आतील ओलावा टिकून राहतो.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
चपाती तव्यावरून खाली उतरवल्यानंतर लगेच त्यावर हलकेसे तूप किंवा बटर लावल्याने चपाती तासन्तास कापसासारखी मऊ राहण्यास मदत होते.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
गरम चपात्या थेट डब्यात ठेवल्यास वाफेमुळे त्या खराब होतात; म्हणूनच डब्यात आधी स्वच्छ सुती कापड ठेवून त्यात चपात्या साठवाव्यात.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
योग्य पद्धतीने पीठ मळणे, चपाती योग्य आचेवर भाजणे आणि कापडात साठवणे या छोट्या सवयींमुळे प्रवासात किंवा डब्यातही चपाती मऊ राहील.
Make Soft Chapati for Long Time
Sakal
Benefits of Eating Cardamom After Meals
Sakal