सकाळ डिजिटल टीम
५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कापड, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर, ताम्हन किंवा स्टीलचे ताट, दिवा आणि अगरबत्ती.
सुगड पूजनासाठी पूजा पाट किंवा चौरंग मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू लावा.
हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य 2 सुगडामध्ये ठेवा. काही ठिकाणी 5 सुगडांचंदेखील पूजन केलं जातं.
सुगडांवर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा.
पाट/चौरंगावर लाल वस्त्र ठेवा. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगड मांडून ठेवा.
त्यानंतर दिवा लावा. सुगडावर हळद कुंकू वाहा. अक्षता फुलं वाहून नमस्कार करा.
तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा.
या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे संसारात धनधान्याचे वाढणे आणि कोणतीही कमीपणाची स्थिती न येवो, तसेच कोणाची वाईट नजर आपल्या सुखी संसारावर लागू नये. असे म्हंटले जाते.