Anushka Tapshalkar
वाढते वय, मोठा आवाज आणि आरोग्यविषयक समस्या यामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास कान निरोगी ठेवता येतात.
मोठ्या आवाजाच्या ठिकाणी असताना कानात ईअरप्लग्ज किंवा नॉईस केन्सलिंग हेडफोन वापरावे.
कानाची स्वच्छता करताना काटेरी वस्तू किंवा कापसाच्या काड्या वापरणे टाळावे. यामुळे मळ अधिक आत जाऊ शकतो.
मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे विकार नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण ते ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी आणि ऐकण्यावर परिणाम करणाऱ्या औषधांचा वापर शक्यतो टाळावा.
ऐकण्यासंबंधी कोणतीही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेडफोनचा आवाज ६०% पेक्षा जास्त ठेवू नका.
सतत कान दुखत असेल किंवा संसर्ग झाला असेल तर दुर्लक्ष करू नका, त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.
वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येक ६ महिन्यांनी श्रवणचाचणी करणे आवश्यक आहे.