सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात उष्णतेमुळे मोबाइल गरम होतो आणि बॅटरी खराब होऊ शकते. काळजी घ्या तुमचा फोन सुरक्षित ठेवा
मोबाइलसाठी जाड कव्हर टाळा. पातळ कव्हर उष्णता बाहेर सोडायला मदत करते.
चार्जिंग करताना किंवा वापरताना मोबाइल थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. उष्णता बॅटरीचे आयुष्य कमी करते.
मोबाइल गरम झाल्यास १०-१५ मिनिटे बंद ठेवा. त्यामुळे तापमान सामान्य होईल.
नेहमी ऑरिजिनल चार्जर आणि बॅटरी वापरा. डुप्लिकेट उपकरणे अपघात घडवू शकतात.
ॲप्स नियमित अपडेट करा. जुने वर्शन मोबाइल जास्त गरम करू शकते.
उन्हाळ्यात मोबाइल बॅगमध्ये ठेवा. शरीराच्या उष्णतेपासूनही मोबाईल गरम होतो.
बॅकग्राउंड ॲप्स बंद करा, ब्राइटनेस कमी करा, सावलीत ठेवा, आणि गरज असल्यास 'एअरप्लेन मोड' वापरा.