Monika Shinde
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांचा एकच प्रश्न की वाचलेलं कसे लक्षात ठेवावं? चला, मग जाणून घेऊया यावर प्रभावी उपाय
पुस्तक वाचन करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी रोज सुर्योदयाच्या वेळी ध्यानधारणा करा, कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम करा. यामुळे मेंदू ताजं आणि सक्रिय राहतो, आणि एकाग्रता वाढते.
एका कोऱ्या कागदावर आकृती काढा आणि ती भडक रंगानी रंगवा. ते कागद भिंतीवर चिकटवा आणि दोन मिनिटे एकटक बघा.
आकृती पाहिल्यावर डोळे बंद करा आणि ती आकृती डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा.
सायंकाळी अभ्यास करताना रफ वही घ्या आणि शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवलेली गोष्ट आठवून लिहा. यामुळे तुमची स्मरणशक्ती हळूहळू वाढेल.