पुजा बोनकिले
उन्हाळा सुरू होताच शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते.
अशा वेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे हे जाणून घेऊया
उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही.
उन्हाल्यात कैरीचे पन्हे प्यायल्याने शरीर थंड राहते आणि हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात चिंच दोन तास पाण्यात भिजत टाकून कुस्करून उरलेल्या पाण्यात साखर वा गूळ व चवीला मीठ टाकून ते सरबत उन्हाळ्यात प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
कोकम सरबत प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात लिंबू सरबत पिणे आरोग्यदायी असते.
नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी ताक प्यावे.