हिऱ्यांच्या दागिन्यांची काळजी कशी घ्याल?

Monika Lonkar –Kumbhar

दागिने

दागिने हा केवळ महिलांच्या आभूषणांचा प्रकार नाही तर, तो महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.

आजकाल सोने,चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये विविध प्रकारच्या डिझाईन्स पहायला मिळतात.

महिलांचा खास करून हिऱ्यांच्या दागिन्यांकडे कल वाढताना दिसत आहे. परंतु, हिऱ्यांच्या दागिन्यांची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच्या टिप्स जाणून घेऊयात.

हिऱ्यांचे दागिने

हिऱ्याचे दागिने किती ही महाग असले तरी, ते नाजूक असतात. चुकीच्या पद्धतीने ते ठेवल्यास दागिने तुटू शकतात.

एकत्र ठेवू नका

इमिटेशन ज्वेलरी सोबत हिऱ्यांचे दागिने कधीच ठेवू नका. यामुळे, हिऱ्यांचे दागिने खराब होऊ शकता किंवा तुटू शकतात.

नाजूक ज्वेलरी वेगळी ठेवा

हिऱ्याची नाजूक ज्वेलरी नेहमी वेगळ्या डब्यात ठेवावी, म्हणजे ती वेळीच सापडते आणि सुरक्षित देखील राहते.

दागिने किती ही महाग असुद्या ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही हिऱ्यांचे दागिने घडी करून ठेवल्यास ते मध्यभागी तुटू शकतात.

अक्षय तृतीयेचा दिन शुभ का मानला जातो?

Akshaya Tritiya 2024 | esakal