पावसाळ्यात अशी घ्या नखांची काळजी...

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात नखांची काळजी घेणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात अनेक आजार, संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे नखं साफ असणे गरजेचे आहेत.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घाणेरडी नखं कशी साफ करू शकता. यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.

या ऋतूत नखं जास्त लांब ठेवू नयेत. लांब नखांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढू लागतात.

यामुळे संसर्गाचा धोका दुपटीने वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात नखं लहान ठेवा.

खराब नखं साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो. गरम पाण्यात व्हिटॅमिन ई तेल टाका आणि नंतर त्या मिश्रणात तुमचे नखं 5 ते 10 मिनिटे बुडवा.

खराब नखं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी आणि शॅम्पू देखील वापरू शकता. कोमट पाण्यात शॅम्पू, गुलाबपाणी आणि थोडेसे मीठ घाला. आता तयार पाण्यात नखं बुडवा. आता हलक्या हातांनी स्वच्छ करा.

लिंबाचा रस तुमची नखं स्वच्छ करण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. पण काही लोकांना असे वाटते की लिंबाचा रस तुमची नखं पिवळी करू शकतो, परंतु तसे नाही.

लिंबाचा रस आणि लिंबाची साल वापरून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. जेव्हाही तुम्ही तुमचे नखं स्वच्छ कराल तेव्हा मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. असे केल्याने नखं तर स्वच्छ दिसतीलच शिवाय चमकदारही होतील.