Coconut Oil : त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा अशा पद्धतीने करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

नारळतेल

नारळतेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फॅटी ॲसिड्स, अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन ई यांसारखे पोषकघटक आढळतात.

त्वचेसाठी आणि केसांसाठी नारळतेल अतिशय लाभदायी आहे.

केस मजबूत

केसांना नारळतेल लावल्याने केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते. शिवाय, केस मजबूत होण्यास मदत होते.

मेकअप रिमूव्हर

नारळतेलाचा वापर तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकण्यासाठी केला जातो.

लिप बामप्रमाणे करा वापर

तुमचे ओठ जर सतत कोरडे पडत असतील तर तुम्ही ओठांंवर लिप बामप्रमाणे नारळतेलाचा वापर करू शकता. यामुळे, ओठ मऊ राहतील.

त्वचेला मॉईश्चराईझ करते

ज्या लोकांना कोरड्या त्वचेची समस्या आहे, त्यांनी त्वचेवर नारळाच्या तेलाचा वापर करावा. यामुळे, त्वचा मॉईश्चराईझ राहण्यास मदत होते.

क्लींझर म्हणून वापर

नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि मॉईश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे तुमची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात.

Hair Oil : केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी 'या' तेलांची घ्या मदत

Hair Oil | esakal