सकाळ डिजिटल टीम
आजच्या जीवनशैलीत आहार असंतुलित आहे. कामाचा ताण, जास्त वेळ बसून राहणे, आणि फूड डिलीव्हरी सर्वसाधारणत: आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देतात.
संतुलित आहार शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे पुरवतो. पारंपरिक आहारात ५५% कार्बोदक, ३०% प्रथिने आणि १५% फॅट्स असतात.
बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीराला पोषक तत्त्वांचे योग्य प्रमाण मिळत नाही. शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे पारंपरिक आहार आपल्यासाठी अपुरा ठरतो.
जास्त कार्बोदकं खाल्ल्याने इन्सुलिन स्पाईक होतो, ज्यामुळे शरीरात फॅट्स साठले जातात. यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार निर्माण होतात.
नवीन संतुलनात कार्बोदकांचे प्रमाण २०%, प्रथिने ४०% आणि फॅट्स ४०% असावे. या बदलामुळे चयापचय सुधारतो आणि जीवनशैलीजन्य आजार कमी होतात.
प्रथिने आणि फॅट्सची वाढवलेली मात्रा आणि कमी कार्बोदकांचे प्रमाण आरोग्य सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे पचन क्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.
आजच्या काळात पारंपरिक आहाराचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. योग्य पोषक घटकांचा समतोल राखल्याने अनेक आजारांवर मात करता येईल.