सकाळ डिजिटल टीम
व्हायग्रा (Viagra) ही एक अत्यंत लोकप्रिय औषध आहे, जिला 'लहान निळी गोळी' (Little Blue Pill) म्हणून ओळखलं जातं. जी जगभरातील लाखो पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर उपाय म्हणून वापरतात.
या औषधाचा इतिहास अत्यंत रोचक आहे. ही अशी गोळी आहे, जी खरोखरच चुकून शोधली गेलीये.
1990 दशकाच्या सुरुवातीला, फायझर या औषध कंपनीत काम करणारे संशोधक एंजायनाचा उपचार करण्यासाठी औषध बनवण्याचा प्रयत्न करत होते. ही हृदयातील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे होणारी एक प्रकारची छातीतील वेदना आहे.
या औषधाला सिल्डेनाफिल (Sildenafil) असेही म्हटले जाते. हे Phosphodiesterase टाइप 5 नावाच्या एका विशिष्ट प्रोटीनला अडथळा निर्माण करते, ज्याला PDE5 म्हणूनही ओळखले जाते.
1990 दशकात एका चाचणी दरम्यान, सिल्डेनाफिल घेणाऱ्या पुरुषांनी फ्लशिंग, डोकेदुखी, पचनसंस्थेचे परिणाम आणि मळमळ यासारख्या साइड इफेक्ट्सबाबत माहिती दिली. त्यातच त्यांनी लिंगाबाबतही आपला अनुभव सांगितला, जो पूर्णपणे अनपेक्षित होता.
या औषधाच्या विकासात मदत करणारे ऑर्गेनिक केमिस्ट सर सायमन कॅम्पबेल (Sir Simon Campbell) यांनी बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये सांगितले, की “त्या काळात आम्ही एक तरुण टीम होतो आणि इरेक्टाइल डिसफंक्शनसारखी कुठलीही गोष्ट आमच्या काळजीचा विषय नव्हती, त्यामुळे अशा औषधाची गरज आहे हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं.”
चाचणीच्या शेवटी काही सहभागींनी आपल्याकडील गोळ्या परत करण्यास नकार दिला आणि त्या घेणे सुरू ठेवण्याची इच्छा दर्शवली. त्यामुळे रिसर्च टीमने हृदयविकाराऐवजी इरेक्टाइल डिसफंक्शनवर सिल्डेनाफिलचे ट्रायल्स सुरू करण्यावर भर दिला.
आता सिल्डेनाफिलला 'व्हायग्रा' या नावाने ब्रँड केलं गेलं आहे. एक अशी गोळी, जी हृदयाच्या कामगिरीपेक्षा जास्त हृदयाच्या आजारांशी संबंधित आहे.
सिल्डेनाफिल पुरुषांच्या लिंगातील रक्तवाहिन्यांमधील स्मूथ मसल सेल्समध्ये सायक्लिक जीएमपीच्या विघटनाला रोखते, त्यामुळे लैंगिक उत्तेजनादरम्यान रक्तप्रवाह वाढतो. इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांमध्ये Cyclic GMP पुरेशा प्रमाणात नसतो.
1998 मध्ये एफडीएने याच्या वापरास मान्यता दिली आणि एका आठवड्याच्या आतच 10 लाखांहून अधिक व्हायग्रा प्रिस्क्रिप्शन दिले गेले. औषध उत्पादक कंपनी 'फायझर'च्या मते, आज जगभरात सुमारे 6.2 कोटी पुरुष या औषधाचा वापर करत आहेत.
क्लिनिकल ट्रायल्समधून हेही स्पष्ट झाले, की सिल्डेनाफिलचा वापर पल्मोनरी आर्टेरियल हायपरटेन्शनसारख्या (Pulmonary Arterial Hypertension) हृदयाच्या आजारांवर देखील केला जाऊ शकतो, जसा की सुरुवातीला हेतू होता.