Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र अंगरक्षक दल निर्माण केले होते.
या अंगरक्षक दलात भरतीचा निर्णय स्वतः शिवराय घेत असत.
या दलात फक्त निष्ठावान, शिस्तबद्ध आणि ध्येयनिष्ठ व्यक्तींचीच निवड केली जात असे.
अंगरक्षकांची व्यवस्था ही शिवरायांच्या नैतिकतेच्या तत्त्वाशी जोडलेली होती.
भालकरी, नेमबाज, बंदूकधारी, वर्कदाज, तोपची आणि हलके शस्त्रधारी अशी विशेष व्यवस्था केली गेली होती.
अंगरक्षकांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान असायची.
शिवरायांचे अंगरक्षक सहा वेगवेगळ्या पथकांमध्ये विभागलेले असत.
प्रत्येक पथकातील सदस्यांची संख्या वीस ते शंभरांदरम्यान असायची.
राजाच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानी आणि राजसदरामध्ये खास द्वारपाल ठेवले जात.
सुरतेच्या मोहिमेदरम्यान मारेकऱ्यांवर तात्काळ कारवाई करून अंगरक्षकांनी शौर्य दाखवले.
अंगरक्षकांच्या गणवेशातून त्यांची ओळख निश्चित केली गेलेली होती.
डच लेखक व मनुची यांनी या अंगरक्षक दलाची माहिती नोंदवून ठेवली आहे.
मनुचीने काढलेल्या चित्रात शिवरायांच्या सभोवती अंगरक्षक दिसतात.
अंगरक्षकांच्या निष्ठेवर शिवरायांचा पूर्ण विश्वास होता.
अंगरक्षकांच्या नैतिकतेवर शिवरायांना कधीही शंका वाटली नाही.