Mansi Khambe
देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'चे काम वेगाने सुरू आहे. अवघ्या काही वर्षांत, ही स्वदेशी बुलेट ट्रेन रुळांवर धावणार असून या भारतीय वेगवान ट्रेनचा कमाल वेग ताशी २८० किमी आहे.
Bullet Train Track
ESakal
आता प्रश्न असा निर्माण होतो की, ही ट्रेन नेहमीच्या रुळांवर धावणार की नवी विशेष रुळ तयार केली जाईल? तसेच ते रुळ कसे असतील, त्याखाली दगडं टाकणार का? त्यांच्यामध्ये किती अंतर असेल?
Bullet Train Track
ESakal
जाणून घ्या, ज्या रुळांवर ताशी २५० किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेनचा रुळ कसा असेल आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय असतील.
Bullet Train Track
ESakal
बुलेट ट्रेनचे रुळ सामान्य रुळांपेक्षा खूपच वेगळा असणार आहे. यामध्ये रुळांखाली खडी टाकण्याऐवजी, एक मजबूत काँक्रीटचा स्लॅब टाकला जाईल. यामुळेच याला बॅलास्टलेस ट्रॅक म्हटले जाते.
Bullet Train Track
ESakal
या विशेष ट्रॅकमध्ये, प्रथम एक मजबूत पाया तयार केला जातो आणि त्यानंतर त्यावर ट्रॅक टाकले जातात.
Bullet Train Track
ESakal
रेल्वेमध्ये, दोन रुळांमधील अंतराला गेज म्हणतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये स्टँडर्ड गेजचा वापर केला जाईल, ज्याची रुंदी १,४३५ मिलिमीटर (सुमारे ४.७ फूट) आहे.
Bullet Train Track
ESakal
बुलेट ट्रेनच्या ट्रॅकबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, नेहमीप्रमाणे ट्रॅकचे लहान तुकडे जोडून ते तसेच ठेवले जाणार नाहीत. यामध्ये, फ्लॅश बट वेल्डिंग मशीनच्या मदतीने रेल्वेचे भाग जोडून २०० मीटर लांबीचे पॅनेल बनवले जात आहेत.
Bullet Train Track
ESakak
या प्रक्रियेला फ्लॅश बट वेल्डिंग म्हणतात. यामध्ये, रेल्वेची टोके गरम करून दाबाने जोडली जातात. यामुळे एक मजबूत जोड तयार होतो.
Bullet Train Track
ESakal
हा ट्रॅक मेट्रोसारखाच असेल. मेट्रोच्या उन्नत आणि भूमिगत विभागांमध्येही, ट्रॅक अनेकदा काँक्रीटच्या पायावर खडीशिवाय बनवला जातो. त्यामुळे, तो बुलेट ट्रेनच्या ट्रॅकसारखा दिसू शकतो.
Bullet Train Track
ESakal