Pranali Kodre
विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. तो भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे.
आजपर्यंत त्याच्या कौतुकास्पद दिग्गजांनी बोललेल्या काही प्रसिद्ध विधानं जाणून घ्या.
एक चांगला खेळाडू होण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभा हवी असते. पण एक महान खेळाडू होण्यासाठी तुमच्याकडे कोहलीसारखी वृत्ती हवी असते. - सुनील गावसकर
विराट हा एक दुर्मिळ प्रतिभा असलेला खेळाडू आहे. त्याला प्रगती करताना पाहण्याच्या प्रक्रियेचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यामुळे मला खूप आनंद मिळतो - गॅरी कर्स्टन
जर मला सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांची निवड करायची असेल तर माझ्या मनात फक्त दोन नावे येतात. एक म्हणजे एबी डिव्हिलियर्स आणि दुसरा विराट कोहली. - नासिर हुसेन
सध्या, विराट कोहली हा जगातील सर्वात महान फलंदाज आहे. – सौरव गांगुली
विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहून मला सचिन तेंडुलकरची आठवण येते.- मायकेल क्लार्क
विराट कोहलीचं यश तुम्हाला चकीत करत नाही, पण त्याचं अपयश चकीत करतं - संजय मांजरेकर
विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा प्रिन्स आहे - इयान चॅपेल
मला विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहायला आवडते. मला त्याची आक्रमकता आणि गांभीर्यताही आवडते. तो मला माझ्या स्वत:ची आठवण करून देतो. - विव रिचर्ड्स
मी सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहिले आहे आणि मी असं नक्कीच म्हणू शकतो की विराटकडे त्याच्याप्रमाणे फलंदाजी करण्याची क्षमता आहे.- इयान हेली
विराट कोहली हा मी माझ्या कारकिर्दीत पाहिलेला कदाचित सर्वोत्तम खेळाडू आहे. - जस्टीन लँगर