मसाल्यातले डुप्लिकेट जिरे असे ओळखा

सकाळ डिजिटल टीम

किचनमध्ये मसाल्यातला जिरा हा अत्यंत महत्वाचा घटक असतो

जिऱ्याच्या चरचरीत फोडणीशिवाय जेवण्याची मजाच नसते

हेच जिरे बाजारात बनावट पद्धतीने विक्रीसाठी येत आहेत

ते ओळखून त्यापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणं गरजेचं आहे

आपल्या घरात आणलेले काही जिरे आधी पाण्यात टाकून बघा

जिरे मळकट रंगाचे दिसले आणि पाणी गढूळ झाले तर ते बनावट जिरे आहेत

खरे जिरे पाण्यात टाकले तर स्वच्छ पिवळसर रंगाचे दिसतात

प्रत्येकाने हा प्रयोग करुन बनावट जिऱ्यांपासून लांब राहिलं पाहिजे