Mansi Khambe
उच्च रक्तदाब, मधुमेह, अनियंत्रित ब्लड प्रेशर धूम्रपान, जास्त मद्यपान, फास्ट फूड, ताणतणाव आणि झोपेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे हृदय कमकुवत होऊ शकते.
हृदय कमकुवत होते आणि योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. विशेषतः चेहऱ्यावर काही लक्षण दिसू लागतात, जे वेळेवर ओळखल्यास हृदयरोग रोखता येतो.
हृदय रक्त योग्यरित्या कार्य करत नाही अशावेळी शरीराच्या अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रंग फिकट होतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळेही खोलवर जातात.
शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ओठ, नखे आणि चेहऱ्यावर निळा किंवा राखाडी रंग येतो. ही लक्षण विशेषतः हृदयविकाराच्या झटका किंवा गंभीर हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये दिसतात.
हृदय योग्यरित्या रक्त पुरवठा न केल्यामुळे शरीरात द्रवपदार्थ साठू लागतात म्हणजेच पाणी साचू लागते. त्याचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर सूज येण्याच्या स्वरूपात दिसून येतो
कमकुवत हृदयाला सामान्य कार्ये करण्यासाठी जास्त काम करावे लागते, ज्यामुळे शरीरात जास्त घाम येतो. जर तुमचा चेहरा कोणतेही जड काम न करता वारंवार घामाने भिजत असेल तर हे हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असे कोणतेही बदल दिसले, विशेषतः थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत दुखणे, तर ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा.
हृदयरोग हळूहळू विकसित होतो परंतु जर चेहऱ्यावर दिसणारी लक्षणे ओळखली गेली तर ईसीजी, इको आणि रक्त तपासणी यासारख्या आवश्यक चाचण्या करा.
ही लक्षणे हृदयरोग्यांमध्येही दिसून येतात, जरी प्रत्येक रुग्णात ही लक्षणे दिसणे आवश्यक नाही. पण जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब रुग्णालयात जावे.