संतोष कानडे
बुऱ्हाणपूर येथे लोक आपल्या शेतात खोदकाम करत असल्याचा व्हिडीओ समोर आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावात सोन्याची नाणी सापडल्याचं लोक सांगतात.
त्यातच छावा सिनेमामध्ये बुऱ्हाणपुरात मुघलांचा खजिना गडप झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकांना येथे खजिना सापडण्याची आशा आहे.
अशा पद्धतीने जमिनीखाली खजिना सापडला तर तो कुणाच्या मालकीचा असतो? ज्याच्या जागेत खजिना सापडतो, त्यावर जागामालक हक्क सांगू शकतो का?
अलहाबाद हायकोर्टाचे सीनिअर वकील रवी रत्नकुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कुणाच्या जमिनीखाली खजिना सापडला तर त्याची माहिती अगोदर जवळच्या ठाण्यात देणं आवश्यक आहे.
जर पोलिसांना किंवा प्रशासनाला याची माहिती दिली नाही भविष्यात त्याला अनेक प्रकारच्या कायदेशीर पेचात अडकावं लागतं.
खजिना सापडल्याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर तो खजिना ताब्यात घेतला जातो. त्यानंतर त्याचा डिटेल रिपोर्ट तयार करुन सरकारला पाठवला जातो.
त्यानंतर हा खजिना सुरक्षितपणे ट्रेसरीमध्ये जमा केला जातो. पुढे सरकार यावर निर्णय घेतं की ट्रेसरीमधील खजिना कुठे पाठवायचा.
अनेकवेळा अशा खजिन्याला अशा संस्थांकडे पाठवलं जातं, ज्या या प्रकरणात रिसर्च करतात. भारतामध्ये अकॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था यावर काम करते.
अॅड. रवीरत्न कुमार सांगतात, अशा प्रकरणात दफिना कायद्यानुसार कारवाई होते. या कायद्यात स्पष्टपणे लिहिलंय की, जमिनीमध्ये कुणाला धन किंवा खजिना सापडत असेल तर त्यावर सरकारचा अधिकार असेल.
एखादा जागामालक सगळी खरीखुरी माहिती जेव्हा प्रशासनाला देतो, तेव्हा सरकार खूश होऊन १० ते २० टक्के जागा मालकाला देऊ शकतं