Anushka Tapshalkar
सवयी आपल्या आयुष्याला दिशा देतात, त्यामुळे चांगल्या सवयींचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी अंगीकारल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
सकाळ सकारात्मकतेने सुरू करायची असेल तर काही सवयी बदलणे गरजेचे आहे. या ५ सवयी सोडल्याने तुम्हाला सकाळी चांगली जाग येईल.
सोशल मीडियावर स्क्रोल करणे किंवा युट्युब व नेटफ्लिक्स सर्फ करणे झोपेची गुणवत्ता बिघडवते, ज्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा घेतल्याने झोप लागण्यास अडथळा निर्माण होतो आणि गाढ झोपेत व्यत्यय येतो.
जर झोपेपूर्वी ठराविक दिनचर्या नसेल आणि तुमची झोप अनियमित असेल, तर शरीराला आराम मिळत नाही आणि सकाळी थकवा जाणवतो.
रात्री उशिरा जड जेवण केल्याने अपचन होऊ शकते, ज्यामुळे झोप बाधित होते आणि सकाळी गुंगी येते.
वारंवार 'स्नूझ' बटण दाबल्याने झोपेचे चक्र बिघडते, ज्यामुळे तुम्हाला अधिक थकल्यासारखे वाटते आणि दिवसाची सुरुवात खराब होते.
दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी ठराविक झोपेची वेळ पाळा तसेच झोपण्यापूर्वी डोकं शांत करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज करा,जसे की वाचन आणि दिवसाची तयारी आदल्या दिवशीच करा. तुमची सकाळ नक्कीच आनंददायक होईल!