Mansi Khambe
भारतात इस्लाम धर्मातील मुस्लिमांना चार लग्न करण्याची परवानगी आहे. तथापि, मुस्लिम महिलेला दुसरे लग्न करण्यापूर्वी तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देणे गरजेचे असते.
एका मुस्लिम पुरूषाला एकाच वेळी जास्तीत जास्त चार बायका असण्याची कायदेशीर मान्यता आहे. मात्र त्या व्यक्तीने पाचव्या महिलेसोबत लग्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
मात्र असे काही मुस्लिम देश असे आहेत जिथे इस्लाम धर्मातील मुस्लिमांना एकापेक्षा जास्त लग्न करण्यावर कडक बंदी आहे. जाणून घ्या यामागचे कारण आणि देशांबद्दल माहिती.
मुस्लिमांना चार विवाहाची परवानगी छंद किंवा मनोरंजनासाठी नसून गरजू परिस्थितीसाठी देण्यात आली आहे. विधवा, असहाय्य स्त्री किंवा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या स्त्रीला मदत करण्यासाठी तिच्या संमतीने लग्न करण्यासाठी मान्यता दिली आहे.
इस्लाममध्ये चार लग्नांना परवानगी असली तरीही काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. एखाद्या मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा जास्त लग्न केले तर त्याची जबाबदारी आहे की तो त्याच्या सर्व पत्नींना समान वागणूक देईल.
ही समानता केवळ जीवनशैली खर्चापुरती मर्यादित नसून आदर, हक्क, वेळ आणि भावनिक वर्तनात देखील असली पाहिजे. जर एखाद्याने पत्नींपैकी एकावर अन्याय केला तर त्याला जाब द्यावा लागेल आणि कठोर शिक्षा भोगावी लागेल.
मुस्लिम देशांमध्ये मुस्लिम एकापेक्षा जास्त लग्न करू शकतात. तर काही देश असे आहेत जिथे फक्त एकच लग्न करता येते. एकापेक्षा जास्त लग्न केले तर हे बेकायदेशीर ठरून त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
तुर्कीमधील ९०% पेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे. परंतु या देशात बहुपत्नीत्वावर बंदी आहे. तुर्की नागरी संहितेनुसार, बहुपत्नीत्व गुन्हा मानला जातो. कायदा मोडल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
ट्युनिशियामध्येही मुस्लिमांची लोकसंख्या खूप जास्त आहे, तरीही येथे एकापेक्षा जास्त लग्नांना परवानगी नाही. या कायद्याचा उद्देश महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे.