Amit Ujagare (अमित उजागरे)
वन जमिनी किंवा जंगल परिसरात माकडांचा वावर तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण माणसांप्रमाणं एखादं गावच माकडांचं असेल तर?
हो महाराष्ट्रात असं एक गाव आहे. या गावातील तब्बल १३० एकर जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर आहे.
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ नावाचं हे गाव आहे. जिथं इंग्रजांच्या काळापासून माकडांच्या नावावर अब्जाधिश रुपये आहेत.
ही केवळ अख्यायिका नसून सत्य असल्याचं या गावातील जुने जाणते लोक सांगतात.
सकाळी आणि संध्याकाळी माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर तुम्हाला या गावात दिसतो.
या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जे काही पिकेल त्याचा एक छोटासा वाटा हा माकडांना अर्पण केला जातो. म्हणजे त्याचा खाद्यापदार्थ बनवून तो माकडांना खायला दिला जातो.
हजारो माकडं या गावामध्ये असल्याचं इथले स्थानिक लोक सांगतात. विशेष म्हणजे माकडांना पोटाला अन्न मिळत असल्यानं ते शेतीचंही नुकसान करत नाहीत.
जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इथल्या माकडांच्या नावावर या गावातील १३० एकर जागा करण्यात आली होती, ती अद्यापही आहे. महसूल विभागात त्याची नोंद असल्याचंही ग्रामस्थ सांगतात.