Monika Shinde
उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डाईट करत असला तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात 'हे' पदार्थ समाविष्ट करा. चला, मग जाणून घेऊया.
ज्वारीच्या पिठाचे सूप तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते. ज्वारीत असलेले फायबर्स पचन सुधारतात, आणि दिवसभर थकवा जाणवत नाही.
बाजरीच्या पिठाचे सूप शरीरासाठी पौष्टिक आणि हलके आहे. बाजरीत फायबर्स, प्रथिने आणि विविध जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचन क्रिया सुधारते.
मिक्स वेजिटेबल सूप एक स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो, ज्यामध्ये विविध भाज्यांचा स्वाद आणि पोषण असतो
टोमॅटो सूप हे स्वादिष्ट, हलके आणि आरोग्यदायी असते. टोमॅटो मध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, आणि जीवनसत्त्व C भरपूर असतात.
उन्हाळ्यात ताजे फळे जसे पपई, खरबूजा, सफरचंद याच्या सेवनाने तुमचे शरीर हायड्रेट राहते. यामध्ये असलेले फायबर्स आणि व्हिटॅमिन्स तुमचं शरीर ताजेतवाने राहते.