आयर्लंडविरूद्ध भोपळाही न फोडणारा तिलक एकटाच नाही; विराट, रोहित अन्...

अनिरुद्ध संकपाळ

आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताकडून जवळपास सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

Tilak Varma

मात्र वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माला आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही.

Tilak Varma

आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाविरूद्ध तिलक वर्मा हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र आयर्लंडविरूद्ध शुन्यावर बाद होणारा तिलक वर्मा हा भारताचा पहिलाच फलंदाज नाही. या यादीत अजून तीन दिग्गजांचा समावेश आहे.

Tilak Varma

आयर्लंडविरूद्ध टी 20 मध्ये सामन्यात विराट कोहली देखील शुन्यावर बाद झाला होता. 2018 च्या दौऱ्यात तो पहिल्या सामन्यात 2 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला होता.

Virat Kohli

यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माला देखील भोपळा मिळाला होता. रोहित देखील 2018 च्या आयर्लंड दौऱ्यावर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा देखील 2 चेंडू खेळून एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

Rohit Sharma

भारताचा टी 20 स्टार सूर्यकुमार यादव देखील 2022 च्या आयर्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता.

Surya Kumar Yadav