सकाळ डिजिटल टीम
सतत मोबाइल किंवा स्क्रिन पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो. त्याचबरोबर, डोळ्यांसाठी आवश्यक पोषक घटक आहारातून कमी मिळत आहेत, ज्यामुळे चष्मा लागण्याची समस्या वाढली आहे.
हल्ली सर्व वयोगटांमधील व्यक्तींना डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलं आणि मोठ्यांचं डोळ्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे.
ओमेगा 3 समृद्ध पदार्थ जसे की चिया सीड्स, जवस आणि अक्रोड हे डोळ्यांसाठी उत्तम आहेत.
डोळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्हिटॅमिन A भरपूर असलेले पदार्थ खा. यामध्ये ब्रोकोली, गाजर आणि पपई हे उत्तम आहेत.
डोळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी झिंकयुक्त पदार्थ खा. यामध्ये हरभरे, डाळी, भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, चीज आणि दूध यांचा समावेश करा.
संस्कारित आहारासाठी संत्री, लिंबू आणि स्ट्रॉबेरी ह्या बेरी प्रकारातल्या फळांचा समावेश करा. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
सुर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, अव्हाकॅडो आणि लाल सिमला मिरची हे सर्व डोळ्यांसाठी फायदेशीर पदार्थ आहेत.