Independence Day: ध्वजारोहणाच्या ‘या’ Unique जागा पाहून व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

स्वातंत्र्यदिन

देशाचा आज 79 वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

ध्वजारोहण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नागरिक

वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक स्वातंत्र्यदिवस साजरा करताना दिसत आहेत.

सियाचीन

सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात भारतीय सैन्याने ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला.

अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतीय कोस्ट गार्डने पाण्याखाली तिरंगा फडकवला.

लडाख

लडाखमधील पॅंगॉंग तलावाजवळ आयटीबीपी जवानांनी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.

जवान

देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.