कसे दिसायचे भारतातील पहिले चित्रपटगृह? १२० वर्षांपूर्वीचे फोटो आले समोर

Yashwant Kshirsagar

मल्टिप्लेक्स युगापूर्वीचा इतिहास

आज मल्टिप्लेक्स आणि ओटीटीचे वर्चस्व आहे, पण पूर्वी लोक पारंपरिक चित्रपटगृहांत चित्रपट पाहायचे. भारतातील पहिले कायमस्वरूपी चित्रपटगृह कोलकात्यात उभे राहिले.

India First Cinema Hall

|

esakal

जे. एफ. मदान

पारशी उद्योगपती जमशेटजी फ्रामजी मदान यांनी १९०७ मध्ये कोलकाताच्या चौरंगी परिसरात भारतातील पहिले खास चित्रपटगृह बांधले. त्याचे नाव होते एल्फिन्स्टन पिक्चर.

India First Cinema Hall

|

esakal

ठिकाण आणि ऐतिहासिक महत्त्व

हे चित्रपटगृह ५/१ चौरंगी प्लेस येथे बांधले गेले. एकेकाळी राजघराण्यातील मंडळी आणि ब्रिटिश अधिकारी येथे चित्रपट पाहण्यासाठी येत असत.

India First Cinema Hall

|

esakal

भव्य वास्तुकला आणि सुविधा

युरोपियन शैलीतील भव्य इमारत, नक्षीदार खांब, मखमली आसने आणि आधुनिक सुविधांमुळे प्रेक्षकांना खास अनुभव मिळे. सुमारे १,७०० प्रेक्षक बसू शकत असत.

India First Cinema Hall

|

esakal

मूकपट काळातील वैशिष्ट्य

मूकपटांच्या काळात चित्रपटगृहात लाइव्ह ऑर्केस्ट्रा वाजवला जाई. पडद्यावरील दृश्यांशी ताळमेळ साधून संगीत प्रेक्षकांना जिवंत अनुभव देत असे.

India First Cinema Hall

|

esakal

आशियातील ध्वनी क्रांती

१९२९ मध्ये एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेस हे आशियातील पहिले चित्रपटगृह ठरले ज्यात कायमस्वरूपी साउंड सिस्टम बसवण्यात आली.

India First Cinema Hall

|

esakal

नाव बदल आणि लोकप्रियता

कालांतराने नाव बदलून आरकेओ एल्फिन्स्टन आणि नंतर मिनर्व्हा सिनेमा झाले. हॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय हो

India First Cinema Hall

|

esakal

चॅप्लिन सिनेमा

१९६०-७० च्या दशकात सामाजिक-राजकीय अशांततेमुळे प्रेक्षक संख्या घटली. देखभालीअभावी इमारतीची पडझड सुरू झाली.कोलकाता महानगरपालिकेने इमारत ताब्यात घेतली. चार्ली चॅप्लिनच्या जन्मशताब्दीनिमित्त नूतनीकरण करून नाव ठेवले चॅप्लिन सिनेमा.

India First Cinema Hall

|

esakal

शेवट आणि वारसा

मल्टिप्लेक्स संस्कृती आणि दुर्लक्षामुळे २००० च्या दशकात हे बंद पडले. डिसेंबर २०१३ मध्ये इमारत पाडण्यात आली. मात्र, एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेस भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अमर वारसा म्हणून सदैव स्मरणात राहील.

India First Cinema Hall

|

esakal

रोज सकाळी मधात काजू भिजवून खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' ७ जबरदस्त फायदे

Cashew With honey Benefit

|

esakal

येथे क्लिक करा