सकाळ ऑनलाईन
बाबू जगजीवन राम हे सत्तरच्या दशकात काँग्रेसमधले सर्वात शक्तिशाली दलित समाजाचे नेते होते. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना ओळखलं जाई.
१९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव करून बाबू जगजीवन राम जनता पक्षात सामील झाले आणि इंदिरा गांधींना जबर धक्का दिला.
यानंतर मनेका गांधींच्या 'सूर्या' मासिकाने एका हायप्रोफाईल सेक्स स्कँडलचा पर्दाफाश केला. यात जगजीवनराम यांचे पुत्र रमेश कुमार यांचे नग्न फोटो छापले गेले.
‘सूर्या’ मासिकाचे सल्लागार संपादक खुशवंत सिंग यांनी हे फोटो पाहून त्यांना ‘पॉर्न’ म्हणत छपाई थांबवण्याचा सल्ला दिला.
संजय गांधींनी स्वतः हे मासिक वितरणासाठी स्टॉलवर पोहोचवलं. बाबू जगजीवन राम यांना पंतप्रधान होऊ नये म्हणून हे षड्यंत्र असल्याची चर्चा झाली.
“माझं अपहरण झालं होतं, हे फोटो बेशुद्धीत काढले गेले,” असा दावा रमेश कुमार याने केला. पण पुरावे काहीच नव्हते.
ज्याच्यासोबत फोटो होते त्या युवतीशी रमेश कुमार याने पुढे लग्न केलं, ज्याला बाबू जगजीवन राम यांचा विरोध होता.
हे स्कँडल बाहेर काढून बाबू जगजीवनराम यांची राजकीय कारकीर्द कायमची खिळखिळी करण्यात आली.