Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी भारतात इस्लामी सल्तनतींचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता.
मुघल साम्राज्याने भारतातील विविध प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
१५२६ मध्ये झालेल्या पानिपताच्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली.
अफगाण पठाण शेरशाहने हुमायूंला पराभूत करून दिल्लीवर आपले वर्चस्व गाजवले.
हुमायूनच्या निधनानंतर अकबर मुघल साम्राज्याचा सम्राट बनला.
अकबरने भारतात मुघल साम्राज्याची मजबूत पायाभरणी करून विविध प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
अकबराने राजपूत राजांना मुघल साम्राज्यात सामील करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
शाहजहानने देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला आणि निजामशाहीवर विजय मिळवला.
निजामशाही, आदिलशाही आणि कुत्बशाही या सल्तनतींनी मुघल साम्राज्याविरुद्ध लढा दिला.
निजामशाहीची राजधानी अहमदनगर होती आणि मुघलांविरुद्ध त्यांची लढाई चालू होती.
मलिक अंबरने मराठ्यांच्या साहाय्याने निजामशाहीचा संघर्ष सुरू ठेवला.
शाहजीराजे भोसले यांनी मुघलांविरुद्ध लढाई सुरू ठेवली आणि निजामशाहीचा कारभार चालवला.
आदिलशाहीची राजधानी विजापूर होती आणि महाराष्ट्रातील अनेक भागांवर त्यांचा प्रभाव होता.
कुत्बशाहीने भारताच्या दक्षिण भागातील प्रदेश ताब्यात घेतला.
कुत्बशाहीची राजधानी गोवळकोंडा होती आणि त्यांनी तेलंगाणा-आंध्रप्रदेशमध्ये आपली सत्ता पसरवली.
गढवाल, कुमाऊँ आणि सिरमूर या राज्यांनी मुघलांच्या आक्रमणांचा विरोध केला.
मध्य भारतात गढ-कटांगा राज्याने मुघलांविरुद्ध झुंज दिली.
देवगड हे एक छोटं राज्य होते, जे मुघलांनी १६३५ मध्ये जिंकले.
केदार फाळके यांनी ही माहिती सकाळ साप्ताहीकाच्या लेखात दिली आहे. (फोटो - गुगल आणि pinterest)