Sandip Kapde
काश्मिरला धरतीचा स्वर्ग म्हटलं जातं, पण तो दोन देशांमध्ये वादाचं कारणही ठरलाय.
स्वातंत्र्यपूर्व काळात काश्मिरमध्ये हिंदू राजा हरि सिंह यांचं राज्य होतं.
राजा हरि सिंह यांनी काश्मिरला स्वतंत्र देश बनवण्याचा विचार केला होता
भारत आणि पाकिस्तान दोघांपासून वेगळं राहण्याची त्यांनी घोषणा केली होती.
पाकिस्तानने काश्मिरवर दबाव टाकण्यासाठी कबिलाई लोकांना पुढे सरकवलं.
कबिलाई लोकांनी काश्मिरमध्ये धुमाकूळ घालत शांतता भंग केली.
लॉर्ड माउंटबेटन यांनी हरि सिंह यांना भारत किंवा पाकिस्तान यापैकी एक निवडण्याचा सल्ला दिला होता
हरि सिंह यांनी मात्र निर्णय घ्यायला वेळ घेतला आणि परिस्थिती बिघडत गेली.
पाकिस्तानने काश्मिरमध्ये बंडखोरी सुरू केली आणि पाकिस्तानी सैनिक श्रीनगरच्या जवळ पोहोचले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने हरि सिंह यांनी भारताकडे मदतीची याचना केली.
महाराजा हरि सिंह यांनी भारताशी विलयाचा करार केला.
भारतीय सैनिकांनी एअर लिफ्ट करून काश्मिरमध्ये प्रवेश केला आणि कबिलाई आक्रमकांना हाकलून दिलं.
मात्र, काश्मिरचा एक भाग म्हणजे मुजफ्फराबाद पाकिस्तानच्या ताब्यात गेला.
काश्मिरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानमध्ये कायमचं वाद सुरू झालं.
आजही राजा हरि सिंह यांचा उशिरा घेतलेला निर्णय भारतासाठी त्रासदायक ठरतोय.