धरमशाला कसोटीपूर्वी टीम इंडियात काय घडतय?

अनिरुद्ध संकपाळ

पदार्पणाच्या कसोटीत दोन अर्धशतकी खेळी करणाऱ्या सर्फराज खानला रोहित शर्माने गुरूमंत्र दिला. त्याने त्याच्यासोबत 20 मिनिटे चर्चा केली.

कुलदीप यादवने देखील प्रशिक्षकांसोबत बराच वेळ घालवला. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीत संघी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला पाचव्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. तो रजत पाटीदारच्या जागी प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता आहे.

रोहित, राहुल अन् भारताचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन यांनी बराचवेळ गप्पा मारल्या. यातून ते पाचव्या कसोटीची रणनिती ठरवत असण्याची शक्यता आहे.

मुकेश कुमारला मालिकेतील बरेच सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपने कसोटी पदार्पण केले. मात्र धरमशालेत मुकेश कुमारने कसून सराव केला.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा युवा खेळाडूंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, आकाश दीप या खेळाडूंनी नेट सेशन एन्जॉय केला.

रोहित अन् रोहितचे वन लायनर.... दोन्ही युनिकच!