Pranali Kodre
९ मार्च २०२५ रोजी भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले.
भारतीय संघाचे हे एकूण सातवे आयसीसी विजेतेपद ठरले. यापूर्वी भारताचे कधी आणि कोणत्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत, पाहा.
भारताने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.
भारतीय संघाने २००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. पण त्यावेळी पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्याने श्रीलंकेसोबत भारताला संयुक्त विजेतेपद मिळाले होते.
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात २००७ सालच्या टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.
एमएस धोनीच्याच नेतृत्वात भारताने २०११ साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
भारताचने जून २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली.