Sandip Kapde
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी हल्ले केले.
देशातील प्रत्येक नागरिक सरकारसोबत उभा राहून पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या भूमिकेत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वाधिक धोकादायक स्थितीत सीमावर्ती गावांतील लोक आहेत.
पाकिस्तान सीमेवरील अखनूर जिल्ह्यातील बुधवाल गावातील नागरिक विशेषतः सतर्क झाले आहेत.
या गावातील लोक आता आपल्या घरांमध्ये बंकर तयार करत आहेत.
हे बंकर युद्धजन्य परिस्थितीत स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरले जातात.
सीमेलगत असलेल्या अनेक घरांमध्ये बंकर बांधणे आता सामान्य गोष्ट बनली आहे.
पूर्वी या बंकरांचा वापर स्टोअर रूम म्हणून केला जात असे.
सध्या मात्र युद्धसदृश वातावरणामुळे हे बंकर पूर्णपणे सज्ज ठेवले जात आहेत.
नागरिक बंकरची स्वच्छता करून त्यामध्ये आवश्यक सामान साठवत आहेत.
बंकरमध्ये पाणी, औषधे, अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू ठेवल्या जात आहेत.
गावकऱ्यांचे मनोबल उंच असून ते पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज आहेत.
सरकारकडून देखील बंकर बांधणीसाठी मदत मिळत आहे.
सीमेवरील स्थिती तणावपूर्ण असून लोक सतत सावध आहेत.
बंकर तयार करून गावकरी युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी करत आहेत.