Mansi Khambe
भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा असून भारतात दररोज अंदाजे १३,००० प्रवासी गाड्या धावतात.
Slowest Speed Train
ESakal
भारतीय रेल्वेतील अनेक गाड्या ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावतात, मात्र एक अशी ट्रेन आहे ज्याचा वेग चक्क सायकलपेक्षाही कमी आहे. ती ट्रेन कोणती आहे आणि तिला इतका वेळ का लागते? जाणून घ्या.
Slowest Speed Train
ESakal
तामिळनाडूच्या उटीमध्ये धावणारी 'मेट्टुपालयम-उटी निलगिरी पॅसेंजर' ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी ट्रेन असून, तिचा वेग ताशी १० किलोमीटरपेक्षाही कमी आहे.
Slowest Speed Train
ESakal
भारतातील सर्वात 'स्लो ट्रेन' जी ५ तासांत फक्त ४६ किलोमीटर अंतर कापते, म्हणजेच तिचा सरासरी वेग ताशी ९ किलोमीटर आहे.
Slowest Speed Train
ESakal
ही एक टॉय ट्रेन असून ती इतकी संथ धावते की, पर्यटक चालत्या ट्रेनमधून खाली जंगलात उतरून पुन्हा ट्रेनमध्ये सहज चढू शकतात.
Slowest Speed Train
ESakal
ही ट्रेन उटीच्या सुंदर मैदानी पर्वत आणि घनदाट जंगलांमधून जाते. अवघे ४६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला तब्बल ५ तासांहून अधिक वेळ लागतो.
Slowest Speed Train
ESakal
ब्रिटिशंच्या काळात सुरू झालेली ही 'निलगिरी माउंटन रेल्वे' आजही ऐतिहासिक वाफेच्या (Steam) इंजिनवर चालवली जाते, जी पर्यटकांसाठी एक खास पसंती आहे.
Slowest Speed Train
ESakal
ट्रेनच्या अतिशय संथ गतीमुळे प्रवाशांना उटीच्या आजूबाजूच्या सुंदर खोन्यांचा आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याची पूर्ण संधी मिळते.
Slowest Speed Train
ESakal