सोशल मीडियावरून पैसे कमावणारे किती आणि कोणता कर भरतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

Mansi Khambe

सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स

डिजिटल जगात सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर वेगाने उदयास आले आहेत. गेल्या दोन वर्षांत वार्षिक २० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची संख्या वाढली आहे.

Influencers Income | ESakal

इन्फ्लुएंसरचे उत्पन्न

काही इन्फ्लुएंसरचे उत्पन्न वार्षिक २ ते ५ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. अशा परिस्थितीत या व्यवसायांशी संबंधित लोकांसाठी एक स्वतंत्र कोड सुरू करण्यात आला आहे. तसेच तपशील न देणाऱ्यांवर कारवाई होते.

Influencers Income | ESakal

कोणता फॉर्म भरावा लागतो?

पण सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्या लोकांना कोणता फॉर्म भरावा लागतो? ते त्यांचे आयकर रिटर्न कसे भरतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Influencers Income | ESakal

फॉर्ममध्ये मोठा बदल

आयकर विभागाने आयटीआर-३ आणि आयटीआर-४ फॉर्ममध्ये मोठा बदल केला आहे. त्यामध्ये पाच व्यावसायिक श्रेणी जोडल्या आहेत.

Influencers Income | ESakal

उत्पन्न

यामध्ये यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया, सट्टेबाजी व्यवसाय, कमिशन एजंट आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडर्समधून मिळणारे उत्पन्न समाविष्ट आहे.

Influencers Income | ESakal

श्रेणी

आतापर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किंवा शेअर बाजारातील व्यापारी त्यांचे रिटर्न भरण्यासाठी इतर श्रेणी वापरत असत. ज्यामुळे ती व्यक्ती कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे हे ओळखणे कठीण होते.

Influencers Income | ESakal

आयकर विभाग

आता त्यांना एक विशेष कोड देण्यात आला आहे. ज्यानंतर त्यांना ओळखण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरून पैसे कमवणाऱ्यांना आयकर विभागाने १६०२१ हा कोड दिला.

Influencers Income | ESakal

कोड

प्रमोशन, डिजिटल कंटेंट किंवा जाहिरातींमधून पैसे कमवणाऱ्यांना हा कोड देण्यात आला आहे. जो आयटीआर-३ आणि आयटीआर-४ दोन्ही फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

Influencers Income | ESakal

आयटीआर ३ किंवा आयटीआर ४

अशा परिस्थितीत सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार आणि अंदाजे करानुसार आयटीआर ३ किंवा आयटीआर ४ दाखल करावे लागेल.

Influencers Income | ESakal

४४एडीएचा पर्याय

तज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीने अंदाजे कर आकारणी अंतर्गत कलम ४४एडीएचा पर्याय निवडला तर त्याला आयटीआर-४ दाखल करावे लागेल.

Influencers Income | ESakal

लष्करी कारवायांसाठी नावं का, कशी आणि कोण ठरवतं? ती प्रक्रिया नेमकी काय असते?

Indian Army | ESakal
येथे क्लिक करा