Anushka Tapshalkar
आज पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांनी चालना दिलेल्या साडी उद्योगाबद्दल आणि त्यामुळे प्रचलित झालेल्या प्रसिद्ध साडीबद्दल जाणून घेऊया.
इंदौरजवळील महेश्वर हे होळकर साम्राज्याची राजधानी होते. इथेच आहे सुंदर नर्मदा घाट आणि अहिल्याबाई होळकरांचा भव्य राजवाडा.
१७६५ मध्ये अहिल्याबाईंनी महेश्वरमध्ये विणकरांना वसवून साडी उद्योगाला चालना दिली आणि पहिली नऊवारी साडी तयार करून घेतली.
या साड्या हलक्याफुलक्या असून त्यात कॉन्ट्रास्ट काठ, तलम ‘जर’, प्लेन किंवा बुट्टीचे पॅटर्न असतात. निसर्ग आणि राजवाड्यातील नक्षीकामातून प्रेरणा घेतलेली असते.
पूर्वी पाने, फुले, मुळे वापरून धाग्यांना रंग दिला जाई. त्यामुळे साड्यांना खास पारंपरिक आकर्षण मिळायचे.
सध्या पारंपरिक पोत जपत हँडब्लॉक, बाटिक, भगरू प्रिंटसह टिश्यू, गंगा-जमुना अशा प्रकारांच्या डिझायनर महेश्वरी साड्या तयार केल्या जात आहेत.
‘हास्य जत्रा’च्या सेटवर सावनीने परिधान केलेली सुंदर साडी पाहून विशाखा सुभेदार भारावून गेल्या.
सावनीने ती नवी साडी विशाखाला गिफ्ट म्हणून दिली आणि स्वतः दुसरी मिळेल याची चिंता केली नाही – एक हृद्य भेट.
सावनीने ती साडी विशाखाला तिच्या अभिनयकलेप्रती आदर म्हणून दिली आणि हे त्यांच्या मैत्रीचं एक खास प्रतीक बनलं.
एका महिन्यानंतर इंदौरमध्ये फिरताना सावनीला अगदी तशीच दुसरी साडी मिळाली! आणि ती म्हणाली – "शिद्दत से चाहो तो साडी सुद्धा परत मिळते!"