छत्रपती घराण्यातील अत्यंत हुशार राजा, मात्र प्रसिद्धीपासून उपेक्षित

Vrushal Karmarkar

छत्रपती घराण्यातील अत्यंत हुशार राजे

अत्यंत हुशार राजे छत्रपती घराण्यात होऊन गेले. मात्र दुर्दैव म्हणजे त्यांच्याबद्दल जास्त कुणाला माहिती नाही.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

सरफोजी राजे भोसले

१६३७ मध्ये शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांनी तंजावरमध्ये स्वराज्य स्थापन केले होते. त्याच घराण्यातील कर्तबगार राजे म्हणजे सरफोजी राजे भोसले.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध

सरफोजी राजे भोसले यांनी तंजावरला विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध केले. तंजावरला असणाऱ्या सरस्वती महाल लायब्रेरीसाठी जगभरातून ४००० हजार पुस्तके विकत आणून ग्रंथालय समृद्ध केले. यात त्यांनी अरबी, फारसी भाषांचे अनुवाद केले.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

आयुर्वेदाचे ज्ञान

सरफोजी महाराजांनी आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धनवर्तीरी महाल बांधला होता. तेथे आयुर्वेद, अॅलोपॅथी आणि चिकित्सा पद्धती यावर संशोधन चालत होते. यात सरफोजी महाराज स्वत: मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया करत होते.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

ग्रंथ लिहिला

सरफोजी महाराजांनी त्यांच्या वैद्यकीय अनुभवातून एक ग्रंथ लिहिला होता. संगीत, कला, नाट्य या सगळ्यालाच त्यांनी प्रोत्साहन दिले होते.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

पहिला छापखाना

सरफोजी राजे यांनी देवनागरीमध्ये पहिला छापखाना टाकला होता. शेतकऱ्यांसाठी हवामान केंद्र सुरू केले होते. तसेच जहाज बांधणी, बंदुकीचा कारखाना तयार केला होता.

Sarfoji Raje Bhosale | ESakal

मराठी साम्राज्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न

३८ वर्षाच्या कार्यकाळात मराठी रियासतीचे नाव सरफोजी राजेंनी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावरचे राज्य खालसा केले.

Sarfoji Raje Bhosale | ESakal
Chhatrapati Shivaji Maharaj Battles | ESakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई कोणती?