International Men's Day: झाशीची राणी ते इंदिरा गांधी..! दिवस पुरुषांचा पण हवा महिलांची, का होते चर्चा?

Anushka Tapshalkar

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

दरवर्षी १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. हा दिवस पुरुषांचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, त्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी भाष्य करतो.

International Men's Day

|

sakal

महिलांची चर्चा

मात्र आज चर्चा पुरुषांची नाही, तर महिलांचीच होत आहे. असं का?

Talks about Women

|

sakal

दिनविशेष

आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासोबतच भारतातील काही अशा महिलांचे वाढदिवस आहेत ज्या भारताची शान आहेत.

Day Special

|

sakal

झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती

आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती. ८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध शूरपणे लढलेल्या या लढवय्यीचं धैर्य, नेतृत्व आणि बलिदान भारतीय इतिहासात आजही प्रेरणादायी ठरत आहे.

Rani Lakshmibai Jayanti

|

Sakal

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही आज जयंती. देशाच्या राजकारणात मजबूत आणि निर्णायक नेतृत्व दाखवणाऱ्या, त्यांच्या कार्यकाळातील कठोर निर्णयांमुळे त्या देशाच्या इतिहासात एक प्रभावशाली पण वादग्रस्त नेता म्हणून ओळखल्या जातात.

Indira Gandhi Jayanti

|

sakal

झीनत अमान

ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री झीनत अमान यांचाही आज वाढदिवस. हिंदी सिनेमातील अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक, 'कुर्बानी, डॉन, सत्यम् शिवम् सुंदरम्, रोटी कपडा और मकान, आणि हरे रामा हरे कृष्ण' हे त्यांचे ब्लॉकबस्टर चित्रपट होते. माध्यमांमध्ये त्या सेक्स सिंबल म्हणूनही ओळखल्या जातात.

Zeenat Aman Birthday

|

sakal

सुश्मिता सेन

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री  सुष्मिता सेनही आज तिचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९४ साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्येही तिने छाप उमटवली आहे.

Sushmita Sen Birthday

|

sakal

International Men's Day 2025: बाबा, भाऊ, मित्र अन् साथीदारला द्या या भन्नाट भेटवस्तू

International Men's Day

|

sakal

आणखी वाचा